'त्या' प्रकरणी शेजाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Crime of culpable homicide in Nagpur खरबीच्या शारदानगर परिसरात घरच्या गटारीत पडून एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी तपासाअंती शेजाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. दानिश फैयाज अंसारी असे मृत बालकाचे तर, इरफान मंगा खान (३५) असे आरोपी शेजाऱ्याचे नाव आहे. गत १७ मार्चच्या दुपारी दानिश परिसरात खेळत होता. खेळता-खेळता तो शेजारी इरफानच्या घरामागे गेला. इरफानने सांडपाण्यासाठी मागच्या बाजूला टाकी बनवली होती. मात्र या टीकीवर कोणतेही झाकन किंवा जाली लागलेली नव्हती. खेळता-खेळता दानिश गटारीत पडला आणि बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. बराच वेळपासून दानिश कुठेही दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
 
 

Crime of culpable homicide in  
 
 
बराच शोध घेऊनही तो मिळाला नाही. शेवटी इरफानच्या घरामागील गटारीत तो दिसला. तत्काळ त्याला बाहेर काढून उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. तपासाअंती इरफानने निष्काळजीपणे टाकीवर कोणतेही झाकण किंवा जाळी लावली नसल्याने दानिशचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता पोलिसांनी दानिशचे वडील फैयाज जेनूल अंसारीच्या तक्रारीवरून इरफानविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.