दारव्ह्यात श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
darva-shri-ram-navami : दारव्हयात श्रीराम नवमीनिमित्त विहिंप, बजरंग दल, रामराज्य मित्र मंडळ, श्रीराम नवमी शोभायात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 26 मार्चला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 

RAM NAVAMI 
 
 
 
या भव्य शोभायात्रेची सुरुवात दुपारी 4 वाजता पूजनानंतर होणार आहे. अध्यक्ष चेतन करोडदेव, उपाध्यक्ष दत्तात्रय राहणे, स्वागताध्यक्ष सुशील राठोड, कोषाध्यक्ष डॉ. गोपाल अग्रवाल आणि सचिव डॉ. रूपेश खंदाडे आहेत.
 
 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दारव्हा पोलिस ठाणेदार शिवप्रकाश मुळे, तसेच स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक शेखर चवरे आहेत. कार्यक्रमस्थळ छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर कविता मंगल कार्यलयासमोर आहे. कार्यक्रमाला सर्व रामभक्तांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.