यवतमाळात जिल्हा कृषी महोत्सव

जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहिती

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
district-agricultural-festival : दरवर्षीप्रमाणे आत्मा व कृषी विभागामार्फत आयोजित जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनाचे शुक्रवार, 27 ते 31 मार्च दरम्यान कृषी विज्ञान केंद्र वाघापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बुधवार, 25 मार्च रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
 
 

y25March-Vikas-Meena 
 
 
 
पुढे बोलताना मीना म्हणाले, हा महोत्सव कृषी विभागासोबतच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा माहिती अधिकारी, ग्रंथालय विभाग आणि नगर परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
 
 
कृषी विभाग 200 स्टॉल्स उभारणार आहे. यात 40 शासकीय दालने, 30 स्टॉल्स कृषी निविष्ठा, 30 स्टॉल्स कृषी तंत्रज्ञान व सिंचन, 40 स्टॉल्स गृहोपयोगी वस्तू, 20 स्टॉल्स धान्य महोत्सव आणि 20 स्टॉल्स खाद्य पदार्थांसाठी राहणार आहेत.
 
 
याकरिता एकूण 8 डोम उभारायचे असून, कृषी विभागाने एकूण 6 डोमची उभारणी सुरू केली आहे. डोम क्रमांक दोनमध्ये शासकीय दालने, 3 मध्ये सेमिनार हॉल, 4 मध्ये कृषी निविष्ठा, 5 मध्ये फुड झोन, खाद्यपदार्थ, 6 मध्ये गृहोपयोगी वस्तू, 7 मध्ये माविम बचतगट व सेंद्रीय शेती, धान्य विक्री उर्वरित दोन डोमपैकी एक पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग आणि एक उमेद यांचे राहणार असल्याचे जिल्हाधिकाèयांनी सांगितले.