हदगाव नप प्रांगणात बीअरच्या पिशवीभर बाटल्या

-शहरातील नागरिकांत सर्वत्र चर्चांना उत -सीसीटीव्हीद्वारे बाहेर येणार वास्तव

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
hadgaon-nagar-panchayat : हदगाव नगर पालिकेच्या प्रांगणात पूर्ण पिशवी भरून टुबॉर्ग या बीअरच्या बाटल्या आढळल्याने नागरिकांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. हदगाव नपाच्या सत्ता बदलानंतर अनेक महिने उलटले असून, जनतेच्या समस्या आजही स्थिर आहेत. पूर्वीच्या सत्तेला जनतेने नाकारले, कारण त्यांचा दावा होता की, ते जनतेच्या समस्या न सोडवता आणि जास्तीत जास्त सेवा देण्याऐवजी वैयक्तिक हितासाठी काम करत होते. त्यामुळे एक वेळ पोलिसांपर्यंत तक्रारही पोहचली होती.
 
 
y25March-Beer
 
 
 
त्यानंतर नगर पालिकेत जनतेच्या प्रतिनिधींनी जनतेसाठी कार्य करणे अपेक्षित असताना नगर पालिकेच्या प्रांगणात बीअरच्या बाटल्या दिसल्या. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांमध्ये परिवर्तनाने शहराचा काय फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या चर्चा आहे की, ही बीअर कोणत्या वर्गाने सेवन केली आहे, कारण कायद्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींसाठी हे सेवन कठोरपणे बंद आहे.
 
 
म्हणजे अठरा वर्षांवरीलच असेल असा प्रथम अंदाज असून नगर पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतील तर त्या माध्यमातून ही बीअर रिचवणारा वर्ग सहज ओळखला जाऊ शकतो. मात्र पुढाकार घेणारा अद्याप कोणी दिसलेला नाही. शिवाय नपाचे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो. नपा प्रांगणात बीअरची पिशवी आढळल्याची नागरिकांमध्ये मात्र चर्चा रंगली आहे.