सततच्या विचारांच्या चक्रातून बाहेर कसे पडाल?

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
cycle of constant thoughts तुम्ही प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीचा जास्त विचार करत असाल, तर ते अतिविचाराचे लक्षण असू शकते. हा अतिविचार अनेकदा एखाद्या दलदलीसारखा बनत असून यातून बाहेर पडणे कठीण वाटते. अशावेळी आपले मन समस्येचे समाधान शोधण्याऐवजी त्याच समस्येत अधिक गुंतत जाते आणि मनावर ताण वाढतो.
 
 
cycle of constant thoughts
 
डॉक्टरांच्या मते, अतिविचार ही केवळ सवय नसून एक मानसिक स्थिती आहे. अनेक वेळा चिंता आणि मेंदूच्या कार्यप्रणालीतील बदल यामुळे हा प्रकार वाढतो. भीती निर्माण करणारा मेंदूचा भाग आणि तार्किक विचार करणारा भाग यांच्यात समन्वय कमी झाल्यास व्यक्तीला योग्य निर्णय घेणे कठीण होते आणि विचारांची गर्दी वाढत जाते. काही वेळा ही सवय अनिश्चिततेच्या भीतीमुळे निर्माण होते. cycle of constant thoughts भविष्यात काय होईल याची चिंता करून मन सतत विविध शक्यता तयार करत राहते. आपल्याला वाटते की प्रत्येक गोष्टीचा आधीच विचार केला तर आपण सुरक्षित राहू, पण प्रत्यक्षात यामुळे मन अधिकच थकते आणि तणाव वाढतो.
 
 
अनेकदा एकाच विचारावर पुन्हा पुन्हा मन केंद्रित होते. भूतकाळातील घटना आठवून पश्चात्ताप करणे किंवा भविष्याची सतत काळजी करणे यामुळे मन एकाच चक्रात अडकून राहते आणि त्यातून बाहेर पडणे कठीण होते. काही लोकांची विचार करण्याची पद्धत खूप सखोल असते, त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करतात आणि त्यातून अतिविचार वाढतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अतिविचार पूर्णपणे थांबवणे शक्य नसले तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. cycle of constant thoughts आपले विचार कधी नियंत्रणाबाहेर जात आहेत याची जाणीव ठेवणे आणि प्रत्येक विचाराला महत्त्व न देणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते, हे समजून घेतल्यास मन अधिक शांत राहू शकते आणि अतिविचारावर हळूहळू नियंत्रण मिळवता येते.