मोठी बातमी! वीजदरात सरासरी इतक्या टक्क्यांनी वाढ

नवीन दर 1 एप्रिलपासून होणार लागू

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
रांची,
increase-in-electricity-tariff : झारखंडमध्ये वीजदरात वाढ करण्यात आली असून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. झारखंड राज्य विद्युत नियामक आयोगाने वीजदरात सरासरी 6.12 टक्के वाढ जाहीर केली आहे. हे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
 
 
bil
 
 
नवीन दरांनुसार, शहरी भागातील घरगुती ग्राहकांना आता प्रति युनिट 7.40 रुपये मोजावे लागणार आहेत, जे पूर्वी 6.85 रुपये होते. तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दर 6.70 रुपयांवरून वाढून 7.20 रुपये प्रति युनिट करण्यात आले आहेत.
 
व्यावसायिक ग्राहकांसाठीही दरात वाढ करण्यात आली असून, ग्रामीण भागात सुमारे 50 पैसे आणि शहरी भागात 60 पैसे प्रति युनिट वाढ झाली आहे. मात्र, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे, वीज वितरण कंपनीने 59 टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव दिला होता, मात्र आयोगाने तो कमी करून फक्त 6.12 टक्के वाढ मंजूर केली. तसेच, वेळेत बिल भरल्यास सवलत आणि प्रीपेड मीटर वापरणाऱ्यांसाठी अतिरिक्त सूट देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
 
या निर्णयामुळे राज्यातील ग्राहकांच्या वीज बिलात वाढ होणार असून, आगामी काळात घरगुती खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.