तुरुंगात असलेल्या उमर खालिदला उमेदवारी द्या!

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
जयपूर,
Nominate Umar Khalid जयपूरमध्ये राजस्थान मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष मोहसिन रशीद यांनी काँग्रेस पक्षाला एक महत्त्वाची मागणी केली आहे. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिदला राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून संधी देण्यात यावी असे त्यांचे म्हणणे असून सध्या उमर खालिद तुरुंगात आहे. रशीद यांच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमधील मुस्लिम समाजाला अनेक वर्षांपासून संसदेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मागील लोकसभा निवडणुकीतही कोणत्याही मोठ्या पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत किमान एक प्रतिनिधी मिळावा, अशी समाजाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
Nominate Umar Khalid
उमर खालिद यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, कोणत्याही व्यक्तीवर आरोप असणे आणि त्या व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरवणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. भारतीय कायद्यानुसार, दोष सिद्ध होईपर्यंत एखादी व्यक्ती निर्दोष मानली जाते. त्यामुळे केवळ आरोपांच्या आधारे त्यांना बाजूला ठेवू नये, असे त्यांचे मत आहे. ते पुढे म्हणाले की, उमर खालिद हे शिक्षित आणि सक्रिय तरुण नेते आहेत, जे समाजातील अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. काँग्रेसने जसे इतर तरुण नेत्यांना मुख्य प्रवाहात आणले, तसेच उमर खालिद यांनाही संधी देऊन पुढे आणावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या मते, जर समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यायचे असेल तर अशा व्यक्तींची निवड करणे गरजेचे आहे.