अखेरच्या सामन्यात न्यूझीलंड पराभूत!

दक्षिण आफ्रिकेने जिंकली मालिका

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
क्राइस्टचर्च,
nz-vs-sa : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३३ धावांनी विजय मिळवत मालिका ३-२ अशी आपल्या नावावर केली. हा सामना हेग्ले ओव्हल मैदानावर खेळला गेला.
 
 
lkl;
 
 
न्यूझीलंडचा कर्णधार जिमी नीशमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ गडी गमावून १८७ धावा केल्या. कॉनर एस्टरहुइजनने ३३ चेंडूंमध्ये ७५ धावांची दमदार खेळी करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. रुबिन हरमनने ३९, तर वियान मुल्डरने ३१ धावांचे योगदान दिले.
 
१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लवकर बाद झाल्याने संघ दबावात आला. बेवन जेकब्सने ३६ धावा करत लढा दिला, तर टिम रॉबिन्सन (२५) आणि डेन क्लीवर (२२) यांनी काही प्रमाणात साथ दिली. मात्र, संपूर्ण संघ २० षटकांत ८ गडी गमावून १५४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
 
दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन आणि जेराल्ड कोएट्जी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकत न्यूझीलंडला धक्का दिला.