खंडणीखोर हरीश सारडाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
वाशीम,
harish-sarda : खंडणीखोर म्हणून ओळख असलेल्या हरीश सारडा याला वाशीम पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या असून, सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
 
 
CSDCF
 
 
 
याबाबत सविस्तर असे की, हरीश सारडा च्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात २६ फेब्रुवारी खंडणी मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी सारडा याला हजर राहण्याबाबात नोटीस बजावण्यात आली होती. मात्र सबंधित आरोपीने पोलिसांना सहकार्य न करता वारंवार टाळाटाळ केली. कधी तब्येतीचे कारण पुढे करुन पोलिस स्टेशन व जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला तर कधी इतर कारण सांगत तपासापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो गाव सोडून फरार झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवूत सापळा रचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे अकोला रोडवरील लालमाती हॉटेल परिसरात पोलिसांनी सापळा रचला.
 
 
मात्र, पोलिसांची हालचाल लक्षात येताच आरोपी वाहनाद्वारे मालेगावच्या दिशेने पळ काढला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन मालेगाव तालुयातील जऊळका येथे पोलिसांनी धाडसी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहेत.
 
 
एका भाजप नेत्याला २५ कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याची तक्रार असून, देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याची तक्रार वाशीम शहर पोलिस स्टेशनला भाजपा पदाधिकार्‍यांनी दाखल केली आहे. हरीश सारडा च्या गुंडगिरीचा अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, त्या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.