असली नोटांच्या मोबदला : चारपट नकली नोटा..!

-फरार आरोपी तीन वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात -नागपूर येथे अटक करण्यात यश

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा,
पुसद, 
Robbery case : वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विजय टॉकीज रस्त्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी चायनीजचा पदार्थांचा ठेला चालविणाèयावर पोलिस कर्मचाèयाच्या मदतीने दरोडा टाकला होता. त्या दरोडाप्रकरणी एकजण फरार झाला होता. तो फरार आरोपी तीन वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला सोमवार, 23 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली.
 
 
KLK
 
 
 
ही घटना 25 जानेवारी 2023 च्या संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान घडली होती. पोलिसासोबत संगनमत करून हा दरोडा टाकल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मारेगाव तालुक्यात कोसारा येथे राहणारा संगपाल उर्फ संगम विजय गाणार (वय 40) असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
 
 
संघपालने पोलिस कर्मचारी युवराज जाधव याच्यासह इतर दोघांच्या मदतीने वसंतनगर पोलिस ठाणे हद्दीत हा दरोडा टाकला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील तकिया धंतोली पटवर्धन ग्राऊंड इंडियन जिमखाना येथे राहणारे संदीप प्यारेलाल गुप्ता (वय 37) यांनी चार अज्ञातांविरोधात वसंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
 
 
संदीप चायनीजचा ठेला लावत होता. त्याच्याकडे पंधरा दिवसांपासून दरोड्यातील एक जण चायनीज पदार्थ खाण्याकरिता येत होता. त्यामुळे त्या दोघांची ओळख झाली होती. त्याने संदीपला असली 500 व 100 रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात चार पट नकली नोटा देतो असे आमिष दाखविले होते.
 
 
जुन्या दरोड्यातील एकजण दहा-बारा दिवसांपूर्वी राजा नावाच्या व्यक्तीला संदीपच्या ठेल्यावर घेऊन आला होता. त्याला नागपूरच्या कॉटन मार्केटमधील जुन्या लॉजवर घेऊन गेला. तिथे दरोडेखोरांनी त्याच्यासमोर 500 रुपयांच्या दोन नकली नोटा व एक शंभरची नकली नोट असे 1,100 रुपये काढून दिले होते. त्यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना राजा नावाच्या व्यक्तीने त्याचा नंबरसुद्धा दिला होता. ‘ओरिजनल’ 4 लाख रुपयांच्या बदल्यात नकली 16 लाख रुपये देतो असे पंधरा दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी सांगितले होते.
त्यानंतर संदीपने पवनला भय्या भाजीवालेंकडून 1 लाख, नातेवाईक व मित्रांकडून 3 लाख असे 4 लाख रुपये जमा केले होते. त्यानंतर राजासोबत संपर्क केल्यावर संध्याकाळी चार लोकांनी 16 लाख रुपयांच्या नकली नोटा देण्याचे आमिष दाखवून विजय टॉकीज रोडवर बोलावले.
 
 
त्यावेळी नकली नोटा संदीपला दाखवून त्या मोबदल्यात चार-साडेचार लाख खèया नोटा त्याच्याजवळून घेऊन पसार झाले होते. दरोडा प्रकरणी अज्ञातांवर वसंतनगर पोलिसांनी 26 जानेवारी 2023 च्या रात्री गुन्हे दाखल केले होते.
तेव्हापासून संगपाल गाणार पोलिसांची नजर चुकविण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत होता. त्याचा ठावाठिकाण निश्चित मिळत नव्हता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकाèयांच्या पथकाने अतिशय शिताफीने फरार आरोपी संगपाल गाणार नागपूरला असल्याची माहिती पथकाने मिळवली होती.
 
 
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकाèयांच्या पथकातील उपनिरीक्षक रवी चव्हाण, पंकज पातुरकर, सुनील मदणे यांनी नागपूर येथे जाऊन संगपाल गाणारला अटक करण्यात यश मिळविले आहे.