सोनिया गांधींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sonia Gandhi admitted to hospital काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने सर गंगा राम रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. त्या सध्या राज्यसभेच्या सदस्या असून काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून कार्यरत आहेत. प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच त्यांचे पुत्र राहुल गांधी तसेच कन्या प्रियांका रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असून रुग्णालयाकडून अद्याप अधिकृत आरोग्यविषयक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
 
 

sonia gandhi 
याआधीही जानेवारी महिन्यात त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यावेळी त्यांना काही दिवस याच रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतरही वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरूच होते. विशेषतः श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्यांना त्या वेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तपासणीत थंडी आणि प्रदूषणाचा परिणाम झाल्याने त्रास वाढल्याचे तसेच त्यांचा दमा वाढल्याचे स्पष्ट झाले होते.
 
गेल्या काही काळापासून त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत असून त्या नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत आहेत. मागील वर्षी हिमाचल प्रदेशातील दौऱ्यादरम्यानही त्यांची प्रकृती खालावली होती. त्या वेळी त्या शिमला येथे आपल्या कन्येच्या निवासस्थानी होत्या. मात्र तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी दिल्लीत आणण्यात आले होते.