वर्धा,
sufficient petrol in wardha वर्धा जिल्ह्यात काल दुपारपासून पेट्रोल पंप बंद होणार असल्याच्या भीतीने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्यांनी तोबा गर्दी केली आहे. जिल्ह्यात पेट्रोल पुरेसे आहे. वाहन चालकांनी घाबरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात पेट्रोल व गॅससाठा आवश्यकते नुसार आहे. पेट्रोल कंपनी पेट्रोल पंप धारकांकडून आधी क्रेडिटवर पेट्रोल देत होते. आता पेट्रोल कंपनीवाले रोख पैसे घेत आहेत. शनिवार, रविवारी सुट्ट्या आल्याने पैसे कंपनी भरल्या गेले नाही. त्यामुळे पेट्रोल मिळू शकले नाही. अशीच परिस्थिती नागपुरात झाल्याने ती अफवा वर्धेत पोहोचली. दुपारपर्यंत पेट्रोल मुबलक होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणवीर यांनी सांगितले.sufficient petrol in wardha पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. सर्वांना पेट्रोल मिळेल असे आरती चौकातील पेट्रोल पंप मालक सोमाणी यांनी सांगितलं.