एलपीजी सिलेंडरसाठी ३५ दिवसांच्या नियम नाहीच...सरकारकडून खुलासा

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
There is no 35-day rule for LPG एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसंदर्भात पसरलेल्या काही अफवांवर सरकारने स्पष्टीकरण देत खोट्या बातम्या असल्याचे स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी दावे केले जात होते की, गॅस बुक करण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र सरकारने असे कोणतेही नवीन नियम लागू केलेले नसल्याचे सांगितले आहे. सरकारच्या निवेदनानुसार, सध्याचे जुने नियमच कायम आहेत. शहरांतील ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची मर्यादा २५ दिवसांची असून ग्रामीण भागात ही मर्यादा ४५ दिवसांची आहे. सर्व नागरिकांसाठी हेच नियम लागू असून त्यात कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही.
 
 
r5७ ६ ७ ८
 
अधिकृत निवेदन जारी
काही अफवांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी वेगळी प्रतीक्षा कालावधी असल्याचे सांगितले जात होते, मात्र सरकारने हे सर्व दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पुढे पसरवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. सरकारने हेही स्पष्ट केले आहे की देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही आणि सर्व नागरिकांसाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे बुकिंगसाठी घाई करण्याची गरज नाही. जर कोणी निर्धारित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर प्रणाली ते बुकिंग आपोआप रोखेल. ही माहिती अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली असून, सर्वांनी फक्त अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा, असे सरकारने सांगितले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि देशात गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे.