वसाडी ते लाडनापुर रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा!

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
संग्रामपूर प्रतिनिधी
तालुक्यातील वसाडी ते लाडनापुर रस्त्याचे तात्काळ Asphalting of Vasadi to Ladnapur road डांबरीकरण करण्या यावे अशी मागणी वसाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे संग्रामपूर तालुक्यातील वसाडी ते लाडनापुर हा रस्ता हा अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 

dambrikaran 
 (संग्रहित छायाचित्र )
 
Asphalting of Vasadi to Ladnapur road  सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अतिशय गंभीर बनते. या रस्त्याचा वापर शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. खराब रस्त्यामुळे शेतमाल वाहतूक अडथळ्यात येत आहे, अपघातांची शक्यता वाढली आहे तसेच वेळ व इंधन यांचा मोठा अपव्यय होत आहे. तरी सदर रस्त्याची तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होईल व सुरक्षित व सुरळीत वाहतूक शक्य होईल. सदर निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव, यांच्या सह आदी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत निवेदनावर सचिन मुझलदा. रायसिंग गाडऱ्या यांच्या सह वसाडी येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत