पाल्याचा पहिली प्रवेश घ्या आणि घर व पाणी कर वाचवा....
बाचेवाडी ग्रामपंचायतचा जि.प. शाळा वाचविण्यासाठी अनोखा प्रयोग
दिनांक :26-Mar-2026
Total Views |
भंडारा,
zp school unique experiment जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन जरा वेगळाच असतो. शहरात पाहायला मिळणारी ही गोष्ट आता ग्रामीण भागातही दिसत आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशीच बंद पडणारी शाळा जिवंत ठेवण्यासाठी पवनी तालुक्यातील बाचेवाडी ग्रामपंचायतीने घेतली ना निर्णय आदर्श असा आहे. गावातील जी व्यक्ती प्रवेश योग्य असलेल्या आपल्या मुला, मुलीचा प्रवेश पहिल्या वर्गात जिल्हा परिषद शाळेत घेईल, त्याला वर्षभराचा घर कर आणि पाणी कर 100% माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत पालकांचा झालेला समज बदलण्याची गरज आहे. कारण आजही काही शाळा आपले वेगळेपण टिकवून आहेत. या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात. शहरी भागातील नागरिकांमध्ये जिल्हा परिषद शाळेविषयी मते वेगळी आहेत. शहरात असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या मोठाल्या शाळा यासाठी कारणीभूत असाव्यात, पण ग्रामीण भागातही जिल्हा परिषदेच्या शाळेकडे ग्रामस्थांचा असलेला ओढा कमी दिसत आहे. अशातच या शाळा वाचाव्यात म्हणून शासन प्रयत्न करीत असतानाच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असेच एक महत्त्वाचे पाऊल पवनी तालुक्यातील बाचेवाडी ग्रामपंचायतीने टाकले. ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेत एक ठराव घेण्यात आला. जे पालक आपल्या पहिल्या वर्गासाठी पात्र असलेल्या पाल्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत प्रवेश घेतील अशा पालकांना पुढील वर्षभरासाठी ग्रामपंचायतीचा घर आणि पाणी कर माफ केला जाईल. हा निर्णय नक्कीच जिल्हा परिषद शाळांना संजीवनी देणार आहे. यापटसंख्या सध्या 19 आहे. त्यामुळे ही शाळा बंद होणाऱ्या शाळांमध्ये आली होती.zp school unique experiment अशावेळी शाळा वाचविण्यासाठी ग्रामपंचायतीने टाकलेले हे पाऊल नक्कीच महत्त्वाचे आणि इतरांना प्रेरणा देणारे आहे. 865 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय शासनाच्या मराठी शाळा वाचविण्याच्या प्रयत्नांना उभारी देणारा आहे.