नागपूर,
Balaji Nagar, Nagpur श्री संत गजानन महाराज मंदिर, बालाजी नगर विस्तार येथे श्री रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री हरिश्चंद्र बाविस्कर महाराज यांनी रामजन्माचे अभंग सादर करत श्रीराम जन्माचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पाडला. त्यांच्या कीर्तनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला माजी राज्यपाल श्री. पुरोहित साहेब आपल्या परिवारासह उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. Balaji Nagar, Nagpur उत्सवात मोठ्या संख्येने भक्तगणांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेवटी आरती करून महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य:वर्षा किडे /कुळकर्णी ,संपर्क मित्र