संग्रामपूर :
Bari Brigade Executive Committee गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर बारी ब्रिगेडचे संस्थापक प्रल्हादराव दातार यांनी राज्य कार्यकारणीची निवड केली. वरवट बकाल येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजीत राज्य स्थरीय पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पुणे येथील ओंकारराव काटोले यांची राज्याध्यक्ष पदी तर नाशिक येथील एकनाथराव बारी व पणज ता . अकोट येथील उद्योजक विजयराव दातीर ह्या दोघांची राज्य उपाध्यक्ष निवड करण्यात आली. अकोला जिल्ह परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव रौंदळे यांची महासचिव तर अकोट येथील सेवानिवृत अधिकारी विजयराव अस्वार यांची महासंघटक पदी निवड करण्यात आली.
राज्य महिला ब्रिगेड च्या अध्यक्षपदी अंजनगांव सुर्जी येथील सामाजीक कार्यकर्त्या शोभाताई सुने यांची तर उपाध्यक्ष पदी यावल जी जलगांव येथील प्राध्यापिका संगीताताई बारी यांची निवड करण्यात आली. राज्य संघटक म्हणुन जळगांव येथील नितिन ढगे आणी नागपुर येथील काशिनाथराव ताडे यांची निवड करण्यात आली. अकोला जिलाध्यक्ष पदी अकोली जहागीर येथील आदर्श शेतकरी तथा सामाजीक कार्यकर्ते गजाननराव धर्मे, जिल्हा संघटक पदी पणज येथील दिलीपराव अकोटकार तर अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अंजनगांव सुर्जी येथील नगर पालीकेचे आरोग्य सभापती प्रविणजी नेमाडे यांची , अमरावती जिल्हा संघटक नितिनजी टिंगणे ( शिरजगांव बंड) यांची निवड करण्यात आली.
Bari Brigade Executive Committee निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकार्यांना संस्थापक प्रल्हादराव दातार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र,देवुन गौरविण्यात आले. सभेला वरवट बकाल, अकोट, अंजनगांव, अमरावती, नागपुर, जळगांव खांदेश आदी भागातील प्रतिनिधी उपस्थित होते. बारी समाजाचे नेते मा. सभापती पांडूरंगजी हागे, गजाननराव ढगे, जेष्ठ समाजसेवक प्रल्हादराव आवंडकार. माजी उपसभापती सुभाषराव हागे यांची प्रमुख उपस्थिती होती.