अशोक खरातला मारून टाका!

भिडे गुरुजींनी दिली आक्रमक प्रतिक्रिया

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
पुणे,
Bhide Guruji's aggressive reaction नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर गाजत असून दररोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणावर नाशिकच्या भिडे गुरुजींनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, अशोक खरातला मारून टाकून विषय मोकळा करा याशिवाय या प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये, असे ते म्हणले.
 
 

Bhide Guruji 
 
दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातच्या संस्थांचे बँक खाते सील करण्यात आले असून त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडून कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी केली जात आहे. राज्यभरातील मालमत्तांचा शोध नोंदणी विभागाकडून सुरू असून कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, हे तपासले जात आहे, तसेच काही मालमत्ता बेनामी असल्याचा संशय आहे. एसआयटीने नाशिक क्राईम ब्रँचकडून डीव्हीआर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आता या सर्व प्रकरणांचा एकत्रित आणि सखोल तपास सुरू असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तपासाला वेग येणार आहे.