शौर्य पदक मिळाणाऱ्यांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास!

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
Bravery Medal and Free Train Travel केंद्र सरकारने शौर्य पुरस्कार मिळविणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानार्थ एक महत्त्वपूर्ण सुविधा दिली आहे. नवीन सरकारी आदेशानुसार, लष्कर, हवाई दल आणि नौदलातील शौर्य पदक मिळाल्या शूर सैनिकांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास मिळणार आहे. ही सुविधा फर्स्ट क्लास, सेंकड क्लास एसी आणि एसी चेअर कारच्या प्रवासासाठी लागू होईल, तसेच त्यांना एका व्यक्तीलाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी असेल. शौर्य पदक मिळविणाऱ्याची पत्नी मग ती विधवा असो किंवा पुनर्विवाहित असो, तसेच अविवाहित मरणोत्तर पुरस्कार मिळणाऱ्यांचे पालक देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
 
Bravery Medal and Free Train Travel
 
 
केंद्र सरकारचे हे पाऊल संरक्षण क्षेत्रातील शूर सैनिकांच्या अपवादात्मक शौर्य आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जात आहे. हा निर्णय केवळ पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक आणि आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने देखील घेण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढेल, तसेच तरुणांना सशस्त्र दलात सामील होऊन देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळेल. हा निर्णय सरकारच्या त्या धोरणाचा भाग आहे जो सशस्त्र दलांच्या कल्याणाला आणि त्यांच्या सन्मानाला प्राधान्य देतो. एकंदरीत, ही घोषणा राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या शूर सैनिकांप्रति राष्ट्राची कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.