सहायक गट विकास अधिकार्‍यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
कुरखेडा, 
Criminal case registered against D. B. Urade खंडणी वसूलीकरीता विशेषतः महिला कर्मचार्‍यांना शारिरीक, मानसिक त्रास देणार्‍या येथील साहायक गट विकास अधिकारी डी. बी. उराडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी तालुक्यातील 42 ही ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
 
 
ga
 
निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा पंचायत समीती कार्यालयात रूजू झाल्यापासूनच सहायक गट विकास अधिकारी उराडे व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेत वाद सुरू आहे. उराडे यांनी रूजू होताच तालुक्यातील बहूसंख्य ग्रामपंचायतींना भेटी देत दफ्तर तपासणीच्या नावाने अभिलेखाची सखोल तपासणी न करता मोघम स्वरूपात अहवाल तयार करीत भ्रष्टाचार झाल्याचा नोटीस संबंधित ग्रामपंचायत अधिकार्‍यांना बजावण्याचा सपाटा सुरू केला आहे. तसेच महिला कर्मचार्‍यांना विशेष टार्गेट करीत त्यांच्या ग्रामपंचायतीत सायंकाळी उशीरापर्यंत तपासणी, आपल्या केबीनमध्ये दोन-दोन तास उभा ठेवत त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याची कृती तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी यामुळे कर्मचार्‍यांची मानसिकता बिघडत आहे.
 
 
 
Criminal case registered against D. B. Urade  त्याचप्रमाणे लगतच्या चंद्रपूर जिल्हातील त्यांचे संबंधित असलेले कथीत पत्रकार, माहीती अधिकार कार्यकर्ते यांच्यामार्फत ग्रामपंचायत कार्यालयाची माहीती व तक्रारीचा सपाटा लावल्याने ग्रामपंचायत अधिकार्‍यांना दैनंदिन कर्तव्याची कामे करणे कठीण झाले आहे. यापूर्वी सूद्धा सदर अधिकार्‍याविरोधात संघटनेकडून जिल्हाव्यापी कामबंद व निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे. महिला कर्मचार्‍यांना मानसिक त्रास देणारे सहायक गटविकास अधिकारी उराडे तसेच त्यांच्या माहीतीवरून ग्रामपंचायत कार्यालयावर खंडणीकरीता दबाव निर्माण करणारे लगतच्या जिल्हातील कथीत पत्रकार व माहीती अधिकार कार्यकर्ते यांच्या विरोधात चौकशी करीत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांना देण्यात आले.
 
 
निवेदन देताना तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर निंदेकर, सचिव लोमेश्‍वर किरणापूरे, उपाध्यक्ष गौतम गेडाम, नरेंद्र आबोने, योगेश टिकले, डाकराम ठाकरे, विलास बावणे, पांडूरंग बुराडे, प्रमोद दूफारे, दिगांबर मिसार, अंबादास राठोड, योगाजी बंसोड यांच्यासह 42 ग्रामपंचायत अधिकारी हजर होते.