सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून दाेघांची फसवणूक

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
cyber fraud Nagpur, शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी सुमारे 40 लाख रुपयांची माेठी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 

cyber fraud Nagpur 
पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरातील अजय गाेतमारे यांना फेसबुक आणि व्हाॅट्सअ‍ॅपद्वारे सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधला. ‘कंपाउंड ट्रेडिंग’ प्लॅटफफाॅर्मवर गुंतवणूक केल्यास माेठा ना मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. अधिक नफफ्याच्या लालसेपाेटी त्यांनी विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 34.65 लाख रुपये जमा केले. नंतर पैसे परत मागितल्यावर ठगांनी आणखी रक्कम भरण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली.
 
 
एका क्लिकमध्ये खाते रिकामे
सेवानिवृत्त कर्मचारी वसंत बारापात्रे यांना क्रेडिट कार्डसंदर्भात एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर माहिती भरताच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या इंटरनेट बँकिंगचा गैरवापर करून त्यांची एफडी माेडून सुमारे 4.91 लाख रुपये दुसèया खात्यात वळवले. याशिवाय त्यांच्या कार्डचा वापर करून 14 हजार रुपयांची ऑनलाईन खरेदीही करण्यात आली. वरील दाेन्ही प्रकरणांत पीडितांनी सायबर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पाेलिसांनी फसवणूक व आयटी कायद्यानुसार गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
 
 
सतर्क राहण्याचे आवाहन
अनाेळखी लिंक, cyber fraud Nagpur,  आकर्षक गुंतवणूक याेजना आणि साेशल मीडियावर मिळणाèया ऑफर्सपासून सावध राहा. एका चुकीच्या क्लिकमुळे आयुष्यभराची कमाई गमवावी लागू शकते. त्यामुळे अनाेळखी लिंक किंवा एसएसएसला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.