रांगेत उभं राहण्याची गरज नाही, वेळेवर मिळणार घरपोच सिलेंडर...

योगी आदित्यनाथ यांनी दिला युपीतील नागरिकांना दिलासा

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
लखनौ,
cylinders-will-be-delivered-to-homes : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील नागरिकांना दिलासा देत सांगितले की, एलपीजी गॅससाठी एजन्सीबाहेर रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही. नियमानुसार बुकिंग केल्यास सिलेंडर वेळेवर थेट घरपोच दिला जाईल.
 

cylinder
 
 
 
राज्यात गॅसटंचाईबाबत पसरत असलेल्या अफवा आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी त्यांनी नागरिकांना घाबरून बुकिंग न करण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडून पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, कोणतीही कृत्रिम टंचाई होऊ दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
तसेच प्रशासन आणि तेल कंपन्यांना पुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांना योग्य आणि वेळेवर सेवा मिळावी यासाठी उपाययोजना सुरू असल्याचेही सांगण्यात आले.