- गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील घटना ; परिसरात खळबळ
गोंदिया,
तालुक्यातील कटंगी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा David Mouje missing सायकलने आश्रमशाळेत जाण्यासाठी घरून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड अनिल मौजे (वय १२ वर्षे, रा. कटंगी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) हा गोरेगाव जवळील घोटी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. होळी सणापासून तो शाळेत जात नव्हता. यावर आश्रमशाळेतील शिक्षकांनी त्याच्या घरी संपर्क साधून मुलाला शाळेत पाठविण्याबाबत सांगितलेते. दरम्यान, २४ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास डेव्हिड हा सायकलने शाळेत जातो असे सांगून घरातून निघाला. मात्र, तो प्रत्यक्षात शाळेत पोहोचला नाही. David Mouje missing सायंकाळपर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी नातेवाईक व परिसरात त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. शेवटी, त्यांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंद केला असून तत्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे कटंगी व परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून सद्या सर्वत्र अपहरणाच्या अफवा पसरल्या असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.