वनाधिकार्‍यांनी केला हत्तींचा पिल्लू ‘कुसुम’चा वाढदिवस साजरा

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
आलापल्ली, 
Elephant baby 'Kusum''s birthday celebrated सिरोंचा वनविभागांतर्गत येणार्‍या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कमलापूर येथील शासकीय हत्ती कँम्पमध्ये एका आगळ्यावेगळ्या वाढदिवसाचा उत्साह पाहायला मिळाला. येथील ‘कुसुम’ नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा वाढदिवस वन कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
 

kusum 
 
Elephant baby 'Kusum''s birthday celebrated  या खास प्रसंगी ‘कुसुम’ साठी एक विशेष ‘फळांचा केक’ तयार करण्यात आला होता. यामध्ये तिची आवडती फळे जसे की केळी, सफरचंद, टरबूज, अननस आणि ड्रॅगन फ्रूट यांचा समावेश होता. सजवलेली ही फळे कुसुमने मोठ्या आनंदाने आपल्या सोंडेने खाऊन वाढदिवसाचा आस्वाद घेतला. या अनोख्या उपक्रमावेळी कँम्पचे महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने वनअधिकारी गौरव गडमाडे, क्षेत्र सहाय्यक संजय पेंडोर, कँम्प इंचार्ज हर्षल शहा आणि इतर वनकर्मचार्‍यांचा समावेश होता.
पर्यटकांमध्ये कौतुकाचा विषय
शासकीय कॅम्पमध्ये पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. प्राणी आणि मनुष्य यांच्यातील जिव्हाळा पाहून पर्यटकांमध्ये जनावरांप्रती आपुलकीची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कमलापूर हत्ती कँम्पमधील हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.