कुवैत विमानतळावर पुन्हा ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
कुवैत,
Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर बुधवारी (२५ मार्च) ड्रोनद्वारे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विमानतळावरील इंधन टाकीला आग लागली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मर्यादित नुकसान झाले असून परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली.
 
 
attack
 
नागरी उड्डाण महासंचालनालयाचे प्रवक्ते अब्दुल्ला अल-राजही यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया लागू करण्यात आल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
 
दरम्यान, इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून कुवैत विमानतळावर अशा प्रकारचे हल्ले वारंवार होत आहेत. यापूर्वी १४ मार्च रोजी ड्रोन हल्ल्यात विमानतळाच्या रडार प्रणालीला लक्ष्य करण्यात आले होते, तर ८ मार्च रोजी इंधन टाक्यांवर हल्ला झाला होता. काही दिवसांपूर्वी प्रवासी टर्मिनलवरही हल्ला झाला होता, ज्यात काही जण किरकोळ जखमी झाले होते. या सततच्या हल्ल्यांमुळे विमानतळ सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून प्रशासन सतर्क झाले आहे.