कोड उत्सव १.० हॅकथॉनचे यशस्वी आयोजन
यवतमाळ,
Jagdamba Engineering स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग व डेटा सायन्सच्या वतीने मंगळवार, २४ मार्च रोजी कोड उत्सव १.० या राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन हॅकथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक‘माचे उद्घाटन संस्थेच्या संचालक ज्योती यांच्या हस्ते झाले. या हॅकथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोग्राम कोडिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यासार‘या कौशल्याचे सादरीकरण करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली. या उपक‘मामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव मिळाला असून नवउपक‘माची दृष्टी विकसित होण्यास मदत झाली. समस्या सोडवण्याची क्षमता, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन आणि सर्जनशील विचार कौशल्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून कार्यक‘माच्या समारोप सोहळ्यामध्ये विजेत्या संघांना सचिव डॉ. शितल वातीले, प्राचार्य डॉ. विजय भांबेरे व सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले.
प्रथम पारितोषिक : टिम लुमिनारा, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती, द्वितीय : टिम पॉवर रेंजर्स, डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक कॉलेज, अमरावती, तृतीय : टिम टेक बाइंडर्स, राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती, चतुर्थ : टिम हॅकर्स हडल, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ यांना मिळाले. या स्पर्धेमधे राज्यभरातील सुमारे ४७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये चार विजयी संघांना सुमारे १ लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली. या कार्यक‘माचे परीवेक्षक म्हणून अमरावती शासकीय महाविद्यालयाचे डॉ. भूषण वाकोडे, डॉ. वैभव पन्नासे, डॉ. देशमुख, प्रा. चंचल क्षीरसागर, प्रा. रश्मी ठाकरे, प्रा. कुणाल पाटील, प्रा. आकांक्षा शुक्ला, प्रा. सारिका सुळके यांनी काम केले. तर इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून रत्नदीप टेंभुरकर यांनी काम केले.
Jagdamba Engineering कोड उत्सव १.० हॅकथॉनचे समन्वयक प्रा. आशिष महल्ले आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चैतन्य देशपांडे, आदर्श भानखेडे, वेदिका सावरकर, गौरवी धानोरकर, मैथिली योगिता कुंभारे, आयुष वडे, तनय मानकर, सोहम ठाकरे, रितेश नागे, स्वराज होले, भाग्येश लुंगे, जय जाधव, ईश्वरी डंभे, यशश्री ठाकरे, ईश्वरी ठाकरे, मोहिनी चांदेकर, तनुजा चांदेकर, राजश्री वोचावार, खुशबू चिकटे, देविका घोगडे, साक्षी कोटरंगे, वेदिका गुघाणे, वैष्णवी मरगडे, नंदिनी लोमटे यांनी कार्य पाहिले.