अनिल कांबळे
नागपूर,
Kinner Samaj किन्नर समाजसेवा ट्रस्ट आणि मठाधीश किन्नर समाज सेवा ट्रस्टच्यावतीने किन्नर समाजाने अग्रेसन चाैकात प्रभू श्रीरामाच्या शाेभायात्रेवर पुष्पवर्षाव करीत आनंद व्यक्त केला. तसेच किन्नर समाजाने शाेभायात्रेत स्वतःचा चित्ररथ साकारला हाेता. किन्नर समुदायांनी चाैकात पिण्याचे थंड पाणी आणि शितपेयाची व्यवस्था केली हाेती.
Kinner Samaj पाेद्दारेश्वर मंदिरासमाेरून थेट अग्रसेन चाैकापर्यंत शाेभायात्रेतील चित्ररथांची मांदीयाळी बघायला मिळाली. त्यामध्ये किन्नर समुदायांच्या समाजसेवेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अग्रेसन चाैकात मठाधीश किन्नर समाज सेवा ट्रस्टच्यावतीने शितपेय आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. शाेभायात्रेत सहभागी हाेणारे तसेच चित्ररथ बघण्यासाठी येणाèया भाविक भक्तांना किन्नर समुदायाच्या वतीने शितपेय आणि पाणी देण्यात येत हाेते. त्यानंतर प्रभूश्रीरामांच्या शाेभायात्रेवर पुष्पवर्षाव केला. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींची पूजा केली. किन्नर समूदायाच्या सदस्यांनी नृत्य सादर करुन आनंद व्यक्त केला.