दुसर्या बॅचचे यशस्वी पूर्णत्व, 255 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी)
गडचिरोली,
Lloyd's LMGSE initiative लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (एलएमजीएसई) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाने गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकासाला नवी दिशा दिली असून, दुसर्या प्रशिक्षण बॅचचे यशस्वी पूर्णत्व गाठत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. 28 जानेवारी रोजी सुरू झालेला हा प्रशिक्षण बॅच 26 मार्च रोजी पूर्ण झाला असून, एकूण 255 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण होताच या विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, रेसिडेंट डायरेक्टर हिम्मत सिंह तसेच एक्झिक्युटिव डायरेक्टर एस. वेंकटेश्वरन यांची प्रमुख उपस्थिती होती. एलएमजीएसई उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या कौशल्य प्रशिक्षणाच्या मर्यादित संधी असलेल्या भागात रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात असून, स्थानिक युवकांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. औद्योगिक व अनुप्रयुक्त कौशल्ये, लॉजिस्टिक्स व ड्रायव्हिंग तसेच हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांतील उत्कृष्टता केंद्रांद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात येतो. वेल्डिंग, इलेक्ट्रिकल कामे, वेअरहाऊस ऑपरेशन्स, ड्रायव्हिंग, फूड अँड बेव्हरेज सेवा, हाऊसकीपिंग व रिटेल या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
Lloyd's LMGSE initiative उल्लेखनीय म्हणजे, 11 डिसेंबर 2025 रोजी सॉफ्ट लॉन्च झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच प्रभावी परिणाम साधले आहेत. 26 जानेवारी रोजी पूर्ण झालेल्या पहिल्या बॅचमधील 527 उमेदवारांना 100 टक्के प्लेसमेंट मिळाले होते. प्रशिक्षण पूर्ण होताच अप्रेंटिसशिप नियुक्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना थेट रोजगाराशी जोडले जात आहे. कार्यक्रमात बोलताना सुहास गाडे यांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी एलएमजीएसईच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तर व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, गडचिरोलीच्या समृद्ध भविष्यासाठी हा उपक्रम पायाभरणी करीत आहे. आमचे उद्दिष्ट केवळ शिक्षण देणे नसून कुशल मनुष्यबळ तयार करणे आहे. आतापर्यंत 2000 पेक्षा अधिक कुशल कामगार तयार करण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले की, गडचिरोलीचा विकास हा स्थानिक लोकांच्या सक्षमीकरणावर अवलंबून आहे. आम्ही ‘नवीन जमशेदपूर’ उभारण्याच्या दृष्टीने काम करीत आहोत. यावेळी त्यांनी प्रगत ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याची घोषणाही केली. या माध्यमातून महिलांना वाहन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा असलेली वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजीत आत्मविश्वासाने संवाद साधल्याचे विशेष कौतुक करण्यात आले. एलएमजीएसई उपक्रमाच्या माध्यमातून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड गडचिरोलीतील युवकांना कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत समावेशक विकासासाठी आपली बांधिलकी दृढ करत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.