भाजपाचा मास्टरस्ट्रोक : सुभाषराव जाधव सभापतीपदावर विजयी

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
मावळ
Maval taluka election मावळ (वडगाव-मावळ) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पक्षाचे सुभाषराव जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलवडे यांचा पराभव करत सभापतीपदावर झेंडा फडकवला. उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 

 Maval taluka election 
निवडणूक जाहीर झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सभापती आणि उपसभापती पद समान कालावधीसाठी वाटून देण्याचे ठरले होते. राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ‘चिठ्ठी’ टाकून संधी देण्याचे निश्चित केले होते. या बैठकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बबनराव भेगडे आणि ॲड. नामदेव दाभाडे यांच्या उपस्थितीत विक्रम कलवडे (सभापती) व विलास मानकर (उपसभापती) यांची नावे निश्चित केली गेली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपाने अनपेक्षितपणे सुभाषराव जाधव यांना उमेदवार उभा करून ठरलेली ‘चिठ्ठी पद्धत’ फाळली, ज्यामुळे प्रत्यक्ष मतदान घडले.
बाजार समितीच्या एकूण १८ Maval taluka election संचालकांपैकी राष्ट्रवादीकडे १२, भाजपाकडे ५ आणि आय काँग्रेसकडे १ मत होते. राष्ट्रवादींच्या गटातील ५ ते ६ मते फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष मतदानात भाजपाचे सुभाषराव जाधव ११ मते मिळवत विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे विक्रम कलवडे अवघी ७ मतांवर कायम राहिले. उपसभापती पदासाठी भाजपाच्या साईनाथ मांडेकर यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांनी निकालाची अधिकृत घोषणा केली.हा निकाल मावळ तालुक्यात एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार सुनील शेळके यांच्यासाठी धक्कादायक ठरला आहे. तालुक्यात राजकीय वारे फिरू लागल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये जोर धरत आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, अंकुश आंबेकर, किरण भिलारे, अरुण चव्हाण, अशोक मानकर यांसह अनेक नेते उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निकालामुळे Maval taluka election, मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे आता पूर्ववत नसल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात तालुक्यातील स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.