लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
लोणावळा
Mumbai Pune Expressway traffic jam रामनवमीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीत अडकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीनंतर आजही घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः लोणावळा घाटात ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
 

Mumbai Pune Expressway traffic jam 
मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेल्या वाहनसंख्येमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, रामनवमीच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी या मार्गावर दाखल झाले. अचानक वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे घाटात वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अडकलेल्या वाहनांची संख्या मोठी असल्याने प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामध्ये घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेक वाहनचालक गाड्यांमधून उतरून रस्त्यावर उभे राहत वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहताना दिसत आहेत. काही ठिकाणी प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर टीकाही केली आहे.
 
 
प्रवाशांकडून सोशल मीडियावर Mumbai Pune Expressway traffic jam  खोचक प्रतिक्रिया उमटताना दिसत असून, “मुंबई-पुणे एक्सप्रेसवेऐवजी ‘संथ मार्ग’ असे नाव द्यावे,” अशी टीका करण्यात येत आहे. काही प्रवाशांनी दररोज २५ ते ४५ मिनिटांचा अतिरिक्त विलंब सहन करावा लागत असल्याचेही सांगितले.मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा महामार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. घाट परिसरातील अवघड भौगोलिक रचना, वाहनांची वाढती संख्या तसेच अधूनमधून होणारे अपघात किंवा बिघाड यामुळे येथे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होते.दरम्यान, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.