नवी दिल्ली,
pm-modi-meeting-with-cms : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशाची तयारी, इंधन पुरवठा, पुरवठा साखळी आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांचा आढावा घेतला जाणार आहे.
ही बैठक केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आली असून 'टीम इंडिया'च्या भूमिकेतून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला जाणार आहे.
मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेणे आणि आवश्यक तयारी सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. सरकारकडून सध्या पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.