रामनवमी शोभायात्रेतून सांस्कृतिक वैभव दर्शन

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
विविध देखाव्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष

यवतमाळ, 
Ram Navami processions श्रीराम नवमीनिमित्त यवतमाळ शहरात भव्य आणि आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. यातून भारतीय संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली ही शोभायात्रा यंदाही विविध वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांनी सजलेली होती. जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
 
 
Ram navami 1
 
यंदा शोभायात्रेत दाक्षिणात्य शैलीत साकारलेेल्या सुशोभित रामरथामध्ये रामदरबार विराजमान होता. हा रथ माजी मंत्री मदन येरावार, सुमित बाजोरिया, नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, नप उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, कंत्राटदार जगजितसिंह ओबेरॉय, राम देवा राऊत, अमोल ढोणे यांच्यासह रामभक्तांच्या हस्ते ओढण्यात आला. या शोभायात्रेचे मु‘य आकर्षण म्हणजे गोवा येथील शिमगोत्सवात प्रथम क‘मांक पटकाविणारा ‘दुर्गासुर वध’ चित्ररथ, गणपती व कार्तिकेय यांचे असुरांसोबतचे युद्धदृश्य तसेच ‘पुलिकाली’ वाघनृत्याचे सादरीकरण. यासोबतच कर्नाटक येथील प्रसिद्ध बावली नृत्य होते.
 

Ram navami-2 
 
Ram Navami processions  पांढरकवडा येथील आदिवासी दंढार नृत्य सादर करणारे २० कलाकार, तालुक्यातील १०० जणांचे भजनी मंडळ, कोलाम पोडांवरील डफ पथक, तसेच रामायणकालीन आणि सामाजिक विषयांवरील १०० हून अधिक देखावे या शोभायात्रेत होते. स्थानिक व्यायामशाळा व आखाड्यांमधील युवकांकडून पारंपरिक कसरतींचेही सादरीकरण करण्यात आले. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवे ध्वज आणि पताकांनी सजावट करण्यात आली होती.

किन्नरांतर्फे राममंदिरात पितळेची अर्पण
 

kinnar
 
रामनवमीनिमित्त जयहिंद चौकातील प्राचीन राम मंदिरात किन्नरांच्यावतीने घंटा अर्पण करण्यात आली. शहरात सुख-समृद्धी नांदावी, सामाजिक सलोखा, शांती नांदावी यासाठी ही घंटा विधीवत पूजा करून मंदिरात लावण्यात आली. याप्रसंगी किन्नरांनी रामनामाच्या गाण्यावर नाचत गात आनंद साजरा केला. आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, असे सांगत त्यांनी श्रीराम’चा जयघोष केला. त्यानंतर मंदिरात राम दरबाराची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी रामभक्तांनी उपस्थित किन्नरांचे आशीर्वाद घेतले. किन्नर समाजाच्या जिल्हाप्रमुख गादीपती गुरू नाझनी नायक, गुरू भुररी सनाबाई, गुरू झाराबाई यांच्यासह किन्नरांची उपस्थिती होती.
शेकडो युवक, युवती प्रभातफेरीत सहभागी
शहरातही पहाटे पारंपरिक वेशभूषेत रामभक्तांनी मोटरसायकलने प्रभातफेरी श्रीरामाच्या प्रतिमा व भगवे ध्वज हाती घेऊन शेकडो युवक, युवती, महिला या प्रभातफेरीत सहभागी झाले होते. रामनामाचा गजर करीत निघालेल्या या रॅलीने शहरवासींचे लक्ष वेधले. दत्त चौकातून निघालेल्या या प्रभातफेरीचे शहरवासींनी रांगोळी व थंडपेयाची व्यवस्था करून स्वागत केले. या दुचाकी रॅलीत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजविण्यात आले.