अनिल कांबळे
नागपूर,
SBL Company Blast राऊळगावातील एसबीएल एनर्जी कंपनीतील स्फोटात 25 कामगारांचा बळी गेला. या प्रकरणामध्ये आराेपी संचालक अलाेक चाैधरी व संजय चाैधरी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज आणि 11 अटक आराेपींचे नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आले. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.
अटक आराेपींमध्ये चंद्रशेखर रजवाड, विलास माळवे, सुधाकर उपरकर, राजेंद्रकुमार पारधी, पंकज पांडे, राेशन राऊत, संदीप साेलंकी, प्रदीप शर्मा, नीलकमल डाेंगरे, रवी कामरा व राकेश तिवारी यांचा समावेश आहे. सध्या गंभीर जखमी 17 कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेटाेनेटर्स, स्लरी एक्सप्लाेसिव्ह, कास्ट बूस्टर आदी स्ाेटकांचे उत्पादन करणाèया एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये 1 मार्च 2026 राेजी सकाळी सातच्या सुमारास विध्वंसक स्ाेट झाला. ही कंपनी राऊळगाव परिसरात कार्यरत आहे. कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही भयानक घटना घडल्याचा अहवाल पेट्राेलियम अँड एक्सप्लाेसिव्ह सेफफ्टी ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रिज सेफफ्टी अँड हेल्थ यांनी दिला आहे. या प्रकरणात कळमेश्वर पाेलिसांनी एकूण 32 आराेपींविराेधात बीएनएस कलम 105, 125 (अ) व (ब), 288 अंतर्गत एफआयआर नाेंदविला आहे. सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगाेटे व अभियाेग सहायक संचालक अॅड. मैथिली काळवीट यांनी बाजू मांडली.
काही दिवसांपूर्वी सत्र SBL Company Blast न्यायालयाने विराेधात निर्णय दिल्यामुळे आराेपी संचालक अलाेक राधेश्याम अवधिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी त्यांच्या अर्जावर राज्य सरकारला नाेटीस बजावून 30 मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. अवधिया यांच्यार्ते वरिष्ठ अॅड. महेश जेठमलानी व अॅड. आदित्य चाैधरी यांनी बाजू मांडली.