एसबीएल कंपनी स्फोटातील आणखी एका गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
मृतांचा आकडा गेला 26 वर : उपचारादरम्यान आतापर्यंत आठ महिलांचा मृत्यू

नागपूर,
काटाेल तालुक्यातील राऊळगाव येथील 'SBL Company Limited' ‘एसबीएल कंपनी लिमिटेड’मध्ये 1 मार्च राेजी झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या आणखी महिला कामगाराचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूची संख्या एकूण 26 झाली असून आरेंज सिटी हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8वर पाेहचली आहे. उषा बालाजी रेवतकर (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे.
 
 
de
 
'SBL Company Limited' उषा रेवतकर यांच्या शरीराचा 50 टक्के भाग भाजला हाेता. गुरुवारी सकाळी 9:35 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कंपनीत झालेल्या स्फोटानंतर एकूण 19 गंभीर रुग्णांना नागपूरच्या ‘आरेंज सिटी हाॅस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ मध्ये दाखल करण्यात आले हाेते. यापैकी एका रुग्णाला रुग्णालयात पाेहाेचण्यापूर्वीच मृत घाेषित करण्यात आले हाेते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतांश रुग्णांना 30 टक्के ते 75 टक्क्यांपर्यंत गंभीर स्वरूपाच्या ‘मिक्सड थर्मल बर्न्स’ जखमा हाेत्या. याव्यतिरिक्त स्फोटातील छर्रे लागल्याने झालेल्या जखमा, कानाचे पडदे फाटल्याने आलेले बहिरेपणा आणि हाडांचे गंभीर फॅक्चर अशा अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण हाेते. उपचार सुरु असतानाच उषा यांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत आठ महिलांचा मृत्यू
'SBL Company Limited' एसबीएल कंपनीतील स्फोटात एकूण 19 कामगार जखमी झाले हाेते. त्यापैकी आतापर्यंत उषा बालाजी रेवतकर, ज्याेती शामू धुर्वे, सुजाता विनायक रक्षित, सीमा विजय धुर्वे, राेशनी सूर्यकांत उमाटे, आम्रपाली अनिल काळसर्पे, दुर्गा केशव सेवतकर आणि रंजना उत्तम घागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्यापही 10 जणांवर उपचार सुरु आहे.
 
 
26 दिवसांनंतरही उपचार सुरु
एक मार्चला घडलेल्या स्फोटाच्या घटनेला आज 26दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दाेन महिलांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली आहे. सध्या मयुरी हरिचरण धुर्वे, दुर्गा मनाेज घाडगे, मनीषा गणेश धुर्वे, काजल वासुदेव काैरती, रीतू आनंदराव सलाम, कविता ज्ञानेश्वर उईके, सुनीता श्रीकृष्ण उईके आणि वैशाली हरिभाऊ धुर्वे यांच्यावर उपचार सुरु आहे.