बुलढाणा,
Sri Ram Navami Celebrations रिपाई रामदास आठवले गट सिंदखेड राजाचे तालुकाध्यक्ष भानुदास शेजूळ यांनी श्रीरामनवमी उत्सव ग्राम चांगेफळ येथे दि. २६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला.
Sri Ram Navami Celebrations याप्रसंगी श्रीरामनवमी निमित राजु पोखरकर यांच्या निवासस्थानी रामनवमी साजरी करण्यात आली सर्व गावकरी महिला, पुरुष उपस्थित होते व तसेच चांगदेवी भजनी मंडाळच्या अध्यक्षा निर्मला मोगल, रावसाहेब मोगल,ढोलकी मास्टर पंडीत जगताप,ओम मोगल,नारायन भुतेकर यांनी रामनवमीचे महत्व समजावून सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवलेचे सिंदखेड राजाचे तालुकाध्यक्ष भानुदास शेजुळ यांनी रामाच्या जीवनावर खुप आसे सुंदर अभंग गाऊन रामाचा पाळना गाईला व सुरेश भाऊ पोखरकर यांनी पुजा केली व राजु पोखरकर यांनी पेढे वाटप केले व निर्मला गंभीराव मोगल यांनी राजु पोखरकर व त्यांच्या पत्नि सीमा पोखरकर याना साडी व टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रिपाइं सि.राजा तालुका अध्यक्ष भानुदास शेजुळ यांनी केले.