नंदू कुलकर्णी
शेगाव : Sri Ram Navami festival Shegaon दिनांक 25 मार्च श्री संत गजानन महारा संस्थान च्या वतीने 132 श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भावाने धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळेस गजानन महाराज संस्थान शेगाव च्या वतीने सर्व शाखा वरती दीड लाखाच्या वर भक्तांना महाप्रसादाची वितरण करण्यात आले. संत गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा आळंदी शाखा त्रंबकेश्वर शाखा ओंकारेश्वर श्री क्षेत्र पंपासरोवर श्री क्षेत्र गिरडा आदि ठिकाणी दिडलाख भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले
श्री संस्थेद्वारा १३२ वा Sri Ram Navami festival Shegaon श्रीरामनवमी उत्सव दि. १९/०३/२०२६ ते २६/०३/२०२६ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६.०० हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात श्री ह.भ.प. श्रीराम बुवा पाटील, उंटावद, श्री ह.भ.प. लखन बुवा पाटील, चिंचखेडा, श्री ह.भ.प. गजानन बुवा काळे, जुन्नर, श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर बुवा वराडे, शेलुद, श्री ह.भ.प. पांडूरंग बुवा आवारकर, कानडदा, श्री ह.भ.प. ज्ञाशवर बुवा काकडे, हावरगांव, श्री ह.भ.प. भगीरथ बुवा काळे, सिन्नर, श्री ह.भ.प. पंडीत बुवा क्षिरसागर, श्री क्षेत्र आळंदी, श्री ह.भ.प. समाधान बुवा शर्मा, बीड यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. तसेच श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारास चैत्र शु. ५ ला प्रारंभ होवून चैत्र शु. ९ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे श्रीहरी कीर्तन होवून नामस्मरणाचे जय जयकारात, टाळ, मृदंग, नगारा व मंगलवाद्याचे गजरात श्रीरामजन्मोत्सव संपन्न झाला. यावर्षी श्रीरामनवमी उत्सवांत श्रींचे सेवेत ९५२ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापै