'एंग्री मॅन’ सोबत अमृता सिंहचा अफेअर

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
मुंबई
Sunny Deol बॉलिवूडमधील ‘एंग्री मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सनी देओल हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि रफ अँड टफ व्यक्तिमत्त्वामुळे कायम चर्चेत असतात. अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सनी देओलच्या खासगी आयुष्याबद्दलही वेळोवेळी चर्चा रंगत असते. विशेषतः त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री अमृता सिंह सोबतच्या नात्याच्या अफवांनी त्या काळात मोठी खळबळ उडवली होती.
 

Sunny Deol, Amrita Singh, Sunny Deol affair rumors, 
1983 साली प्रदर्शित झालेल्या बेताब या चित्रपटातून सनी देओल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमृता सिंह त्यांची नायिका होती. चित्रपटाच्या यशानंतर दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि 1984 मधील सनी या चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केले. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे ऑफस्क्रीन अफेअरच्या चर्चांना जोर आला होता. त्या काळात अनेक चित्रपट मासिकांमध्ये या दोघांच्या नात्याबाबत विविध बातम्या प्रसिद्ध होत असत.
मात्र, या चर्चांदरम्यानच Sunny Deol सनी देओल यांनी पूजा देओल यांच्याशी साखरपुडा केला होता. एका मुलाखतीत त्यांना या अफवांबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच मला माहीत होतं की लोक काय लिहितात आणि काय बोलतात. हे सगळं सहन करावं लागतं. काही वेळा खूप रागही येतो, विशेषतः जेव्हा चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात,” असे ते म्हणाले होते. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली.सनी देओल यांनी 1984 मध्ये पूजा देओल यांच्याशी विवाह केला. पूजा या नेहमीच प्रकाशझोतातून दूर राहणं पसंत करतात. प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असूनही त्यांनी साधं आणि खाजगी आयुष्य जगण्याचा मार्ग निवडला आहे. या दाम्पत्याला करण देओल आणि राजवीर देओल अशी दोन मुलं असून त्यांनीही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.सध्या जुन्या मुलाखतीतील सनी देओल यांचे वक्तव्य पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या बेधडक स्वभावाची चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे.