6 वर्षांनंतर तब्बूचे पुनरागमन

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
मुंबई
Tabu बॉलिवूडची अष्टपैलू अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. तब्बू नुकतीच 2025 मध्ये आलेल्या ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटात दिसली होती, मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. आता ती लवकरच अजय देवगणच्या ब्लॉकबस्टर ‘दृश्यम’ ) फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बॉलिवूड प्रोजेक्ट्ससोबतच, ती तब्बल 6 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर साऊथमध्ये दमदार कमबॅक करत आहे.
 

Tabu comeback South cinema 
तब्बूच्या या पुनरागमनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एका अत्यंत महत्त्वाकांक्षी पॅन-इंडिया प्रोजेक्टचा भाग असणार आहे. या चित्रपटात ती अशा एका दमदार अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे, ज्याने एकेकाळी शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर तगडी टक्कर दिली होती. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती आहे. तब्बू आणि विजय सेतुपती ही दोन Tabu comeback South cinema  अभिनयाची दिग्गज व्यक्तिमत्त्वे पहिल्यांदाच एकत्र एकाच चित्रपटात काम करताना दिसणार आहेत, ज्यामुळे या चित्रपटाची चर्चा आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.