अबू धाबी,
Two killed in missile debris fall संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथील स्वेहान रोडवर क्षेपणास्त्राचा मलबा पडल्याने दोन व्यक्ती ठार झाले. तसेच इतर तीन जखमी झाले. या घटनेत रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने देखील उद्ध्वस्त झाली आहेत. यापूर्वी इराणने कुवेतवर हल्ला केला होता. कुवेतच्या लष्कराच्या जनरल स्टाफ मुख्यालयाने गुरुवारी सकाळी एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला.
सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियालाही रात्री इराणकडून अनेक हल्ल्यांचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. रात्रीच्या वेळी देशाला इराणकडून आठ यूएव्ही ड्रोन हल्ल्यांचा तडाखा बसला. ही घटना मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थितीवर ताण निर्माण करणारी ठरली असून, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला आहे.