दुपारी मेरे प्रभू राम आये है; सायंकाळी राम जी की निकली सवारी!

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
जिल्हा भगवामय, श्रीराम जन्माचा जल्लोष!
 
वर्धा, 
Wardha: Shri Ram procession दोन दिवसांपासुन आर्वी नाका, इंगोले चौक ते सोशॉलिस्ट चौक अक्षरश: भगवा होऊ लागला होता. जिल्ह्यातही सर्वत्र राममय वातावरण होते. वर्धेतील श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म झाला. सायंकाळी शहरातील चारही बाजूने श्रीराम शोभायात्रा निघाली. त्यामुळे दुपारी मेरे प्रभू राम आये है; सायंकाळी राम जी की निकली सवारी! असेच वातावरण तयार झाले होते. वर्धेत गोलबाजार येथील श्रीराम मंदिर येथे सकाळी १० वाजता इंदोर येथील श्रृती भंडारे यांनी राम जन्माचे कीर्तन सुरू केले दुपारी १२ च्या ठोयाला अन् झाला रामाचा जन्म म्हणताच सभागृहात जय श्रीरामचा जय घोष झाला. गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला. ११ सुहासिनींनी रामाला पाळण्यात घातले. राम जन्माला शहरातील शेकडोंची उपस्थिती होती. सकाळी १० वाजता माहेश्वरी समाजाच्या वतीने राम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. आर्वी नाका चौक गेल्या दोन दिवसांपासुन भगव्या पताकांनी नटून गेला आहे.
 
 
shkobha yatra
 
Wardha: Shri Ram procession इंगोले चौकात अखिल आर्यवत संघ आंतर राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने दुपारी १२ वाजतापासुन महिलांनी सुंदरकांडचे पठन केले. सोशॉलिस्ट चौकात युवा व्यापारी मंडळाच्या वतीने श्रीराम शोभायात्रांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम मंदिरात रा. स्व. संघाचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, रामदास डोणे, वर्धा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुधाकर सटोणे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, युवा समाजसेवक प्रदीप बजाज, भाजपा नेेते गुंड्डू कावळे, सुनील गफाट, साई मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल व्यवहारे, दिलीप पाचखडे, आदींनी पालखी पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. गोल बाजार, सराफ लाईन, बालाजी मंदिर, कपडा लाइन, पत्रावळी लाईन, अंबिका चौक, झेंडा चौक, शनी मंदिर चौक, सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट, अष्टभुजा चौक, बढे चौक, श्रीराम दरबार चौक, दत्त मंदिर चौक मार्गे पदक्रमन करीत राम मंदिरात समारोप झाला. शोभायात्रेत श्रीराम युवा पथक, त्रिशूलधारी, आदिवासी नृत्य, जगन्नाथ यांचा रथ, इस्कॉन आंतरराष्ट्रीय संस्थेचे भजन मंडळ, विविध भजन मंडळी, श्री राम रथ, प्रभू श्रीराम पालखी तसेच सर्वात शेवट शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरलेले खाटू श्याम झांकी व प्रथमच लाइव्ह श्री श्याम भजन नागपूर येथील गायिका स्मिता गणूवाला तसेच श्याम पांडे यांनी सादर केले. शोभायात्रेत सर्वात पुढे अश्व, मंगलवाद्य होते. फटायांची आतषबाजीसह फुलं उधळत शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. वर्धेकरांच्या परंपरेप्रमाणे ठिकठिकाणी लंगरही लावण्यात आले होते. शोभायात्रेत श्रीराम मंदिरचे उपाध्यक्ष संजीव लाभे, सचिव विजय धाबे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशीकर, आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेकरिता राजेंद्र उमाटे, कमल कुलधरिया, शिरीष जवदंड, मनोज पाचखेडे, राजेंद्र सोनी, विनोद भारद्वाज, प्रकाश परसोडकर, सतीश कातरकर, भूषण अग्निहोत्री, मधूकर जोशी, आदींनी सहकार्य केले.
 
 
Wardha: Shri Ram procession शहरातील गोंडप्लॉट येथुन वरुण पाठक यांनी श्रीराम शोभा यात्रा काढली. गांधीनगर येथील श्रीराम शिव मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावर्षी प्रथमच आर्वी नायावर सायंकाळी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
 
 
दुप्पट उत्साह अन् धडधडही
दिवसभर कडक उन्ह असतानाही रामजन्माचा उत्साह रात्री उशिरापर्यंत रामभतांमध्ये कायम होता. गेल्या अनेक वर्षात यावर्षीचा उत्साह दुप्पट होता. परंतु, सोशॉलिस्ट चौकात युवा व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यक्रमातील डीजेने मात्र रस्त्याहून जाणार्‍यांना धडधड होत होते.