पूर्वी स्मशानभूमींना निधी, आता मंदिरांना प्राधान्य!

योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
गोरखपूर.
Yogi's attack on opponents मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील आयोजित पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पक्षाचे नाव न घेता पूर्वीच्या काळातील गैरव्यवस्थापन, पोलिसांचा लाठीचार्ज आणि सरकारी छळ याचा उल्लेख करत त्याची आजच्या परिस्थितीची तुलना केली. त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी मंदिरांना सुविधांपासून वंचित ठेवले जात असे आणि निधी स्मशानभूमींना दिला जात असे; आता मात्र चित्र बदलले मंदिरांना प्राधान्य देण्यात येत आहे.
 
 
 
yogi
 
१,५०० मंदिरांना सुशोभीकरणासाठी निधी
मुख्यमंत्री योगींनी  सांगितले की, अयोध्येतील परिस्थिती आधी वेगळी होती, जिथे लोकांना सरकारी त्रास सहन करावा लागत असे. आता या , मात्र आज ते शहर जगातील सर्वात सुंदर शहरांमध्ये मोजल्या जाते आणि तिथे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. त्यांच्या सरकारच्या काळात विंध्यवासिनी मातेच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्यातील जवळपास १,५०० मंदिरांना सुशोभीकरणासाठी निधी दिला गेला असून यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत सांगितले की, सध्याचे सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने चालेल आहे. पुढेही डबल-इंजिन सरकारद्वारे दुप्पट वेगाने प्रगती केली जाईल आणि मागील दुर्बलतेचा पूर्णपणे नाश होईल, असे त्यांनी नमूद केले.