आशोक खरातची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat विधीचे कारण देत, अनिष्ठाची भीती दाखवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे बिंग फुटल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. अशोक खरातचे अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले होते . दरम्यान, अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे. तसेच अशोक खरात याच्या एचआयव्ही चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
 

Ashok Kharat, HIV test negative, Nashik, sexual assault 
स्वत:कडे दैवी शक्ती Ashok Kharat असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरात याने त्याच्याकडे समस्या निवारणासाठी येणाऱ्या अनेक महिलांचे विविध कारणे देत, काहीतरी वाईट घडण्याची भीती दाखवून तसेच योनी शुद्धीसारखे विधी करण्याचा बहाणा बनवून लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते. एका पीडित महिलेने खरातविरोधात तक्रार दिल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. तसेच पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेत तपास करून अशोक खरात याला बेड्या ठोकल्या होत्या. खरात पोलीस कोठडीमध्ये असूनही एचआयव्ही चाचणी करण्यात आली अहवालानुसार त्यात कोणतीही बाधितता आढळलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.या प्रकरणाची सुरुवात एका महिलेच्या तक्रारीनंतर झाली, ज्यात तिने २०२२ ते २०२५ दरम्यान खरात याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी अनेक महिलांच्या शोषण प्रकरणांच्या एफआयआर नोंदवल्या आणि तपासासाठी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केले.एसआयटी सध्या आरोपीच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करत असून तपास सखोल चालू आहे.

कोणी केली होती मागणी?
विधानसभेत भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात प्रकरणावर चर्चा चालू असताना काँग्रेसने स्थगन प्रस्ताव आणला. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच घेरले. भोंदूबाबाला जे-जे भेटले आहेत, जे व्हिडीओ क्लीपमध्ये आले आहेत. व्हिडीओमध्ये आले आहेत त्या सर्वांच्या मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच या भोंदूबाबाला जे जे भेटले आहेत त्या सर्वांची एचआयव्ही टेस्ट करून घ्यायला हवी, असे म्हणत सरकारनेच या चाचण्या करून घ्यायला हव्यात. नाहीतर सगळेच संसर्गान मरतील, अशी चिंताही व्यक्त केली.