अशोक खरातवर पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल?

रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
नाशिक,
Ashok Kharat नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात याच्या अडचणी आता वाढतच आहेत. महिला अत्याचार प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर पोस्कोअतंर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, त्याला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरात याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
 

Ashok Kharat Nashik POCSO case 
नेमकं काय म्हणाल्या ठोंबरे?
 
‘भोंदूबाबा 10वी नापास खरातने, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा सोडले नाही त्यांच्यावर त्याचे आई वडील बाहेर थांबून नराधमाने अत्याचार केला.पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल . राज्य महिला आयोग चाकणकर तू संविधान पदावर बसून महाराष्ट्राचे माता भगिनी लेकरांचे कुटुंबाचे वाटोळे केले बाई. तात्काळ अटक झाली पाहिजे. तुझे चोचले पूर्ण करणाऱ्या लोकांसह 100 फटके मारून 1 मोजले पाहिजे.’ अशी पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
 
दरम्यान दुसरीकडे Ashok Kharat आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये काही नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो दाखवले आहेत. यामध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचा समावेश आहे. सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबत असलेले काही फोटो दाखवले आहेत. दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करावी, दीपक केसरकर आणि चाकणकर यांचे कॉले रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान खरात आणि केसरकर यांचा नेमका काय संबंध आहे? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात खरात याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.