कारगिल चौकात कारचा अपघात, चालक गंभीर जगखी

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
गडचिरोली, 
car-accident : गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे काल, गुरुवारी 26 मार्च रोजी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कार चालक गंभीर जखमी झाल. अनियंत्रित झालेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेड्स उडवत तब्बल 100 ते 150 फुटांपर्यंत सरपटत जाऊन पलटी मारली. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
 

j 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन हे मारुती सुझुकी कंपनीचे सिलेरिओ मॉडेल असून वाहन क्रमांक एम-31-इके-5991 असा आहे. या अपघातात वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले. देव राहुल महात्मे (22) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला व पाठीला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक उपचारात निष्पन्न झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
 
चालकाने निष्काळजीपणे व वेगात वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित वाहन कॉम्प्लेक्सकडून गडचिरोली शहराच्या दिशेने येत असताना कारगिल चौकाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूच्या बॅरिकेड्सवर धडकले. त्यानंतर वाहन चौकाच्या मध्यभागी पलटी झाले आणि गाडीचे चारही चाक वरच्या दिशेने झाले. या अपघातात नगरपालिकेचे दिशादर्शक दोन फलक तसेच महामार्गालगत उभारलेले सहा ते सात लोखंडी बॅरिकेड्सचे मोठे नुकसान झाले आहे.
 
 
अपघातावेळी चालक नशापाणी घेतलेला होता का, याबाबतही प्रत्यक्षदर्शींनी शंका व्यक्त केली असून याबाबतची खात्री पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.