नागपूर,
old age homes नागपूर येथील अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने बुटीबोरी येथील वृद्धाश्रमाला अन्नधान्य व खाद्य सामग्रीचे वितरण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष देवीदास आगरकर आणि सचिव वसंतराव इझनकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
राजू मिश्रा ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत, ‘पूर्णब्रह्म अभियान’ अंतर्गत जमा झालेले अंदाजे सात क्विंटल अन्नधान्य, इतर खाद्य सामग्री तसेच ६,५०० रुपये नगदी वृद्धाश्रमाला प्रदान करण्यात आले. old age homes या अन्नधान्य वितरण कार्यक्रमाला अशोक सांभारे, डॉ. राजेश कुऱ्हाडे, विलास वाकडे, गणपतराव निंबाळकर, राजेश्वर डगरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र