चोरींच्या संशयावरून बापाने दोन मुलींना उलटे लटकवले...एकीचा मृत्यू

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
सांगली
Sangli Crime आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप चिमुकल्यांना उलटं टांगून रात्रभर अमानुष छळ करण्यात आला. या क्रूर अत्याचारात 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
 

Father hangs two girls upside down on suspicion of theft.one dies Sangli Crime 

काय आहे घटना?
केवळ शेजारच्या Sangli Crime घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांवर त्यांच्या आई-वडिलांकडू निर्दयी अत्याचार करण्यात आला. नाना हैबत यमगर असं मुलींच्या वडिलांचे नाव आहे. मुलींच्या वडिलांनीच दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले . रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' अशी आर्त हाक देत होत्या. मात्र, निर्दयी आई-वडिलांनी त्यांना मदत तर दूरच, पाण्याचा थेंबही दिला नाही. वेदना सहन झाल्या नाही आणि सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. मुलींच्या आजोबांनी मुलींना खाली उतरवले , मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती.अनुजाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर सानिकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .
अनुजा Sangli Crime शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघड झाला. 'वडिलांनी आम्हाला उलटे टांगून मारहाण केली' असं तिने सांगितल्यावर डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि या अमानुष घटना समोर आली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींवर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे समाजमन हादरलं असून बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.