मुंबई,
February installment of Ladki Bhaeen Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी महिला दर महिन्याला १५०० रुपये मिळवते. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यासाठी २२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा निधी जमा होईल.

मंत्री तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे ही योजना यशस्वीपणे पुढे सुरू राहणार आहे.यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यातील निधी जमा होण्याने घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील चार महिन्यांचा हप्ता एकत्र येऊन काही लाभार्थ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा होणार आहेत.