ग्वाल्हेरमध्ये स्कॉर्पिओच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच ठार

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
ग्वाल्हेर,
Five of a family killed in Gwalior मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात घडला. शीतला माता मंदिराच्या यात्रेवरून परत येत असलेल्या ऑटो-रिक्षाला एका स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऑटो-रिक्षामध्ये चालकासह एकूण नऊ जण होते. धडकेनंतर उर्वरित चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
 
 
killed in Gwalior
 
 
जखमींमध्ये एक महिला, एक पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. सध्या त्यांच्या उपचार सुरू आहेत. हा अपघात ग्वाल्हेर जिल्ह्यातील थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, परशुराम चौकाजवळ घडला.  धडक देणाऱ्या स्कॉर्पिओतील लोक घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून वाहन शोधण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताने ग्वाल्हेरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.