सेलू,
tb-free : सेलू तालुक्यात क्षय रोग नियंत्रण अभियान राबविण्यात आले या अभियानात नवरगाव पुनर्वसन हे गाव क्षय रोग मुत म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
पंचायत समिती येथील सभागृहात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या ग्राम पंचायत ने पुरस्कार पटकाविला आहे. २४ रोजी क्षयरोग दिनानिमित्त पंचायत समितीत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ग्रामपंचायत नवरगाव हे टीबी मुत असल्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे यांच्या हस्ते ग्रापंचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक गटविकास अधिकारी चोपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी खेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वरठी तसेच विस्तार अधिकारी चालाख आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत नवरगाव तर्फे ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल मुजबैले, वैद्यकीय अधिकारी डॉ. आचल ठाकरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा ढगे, आरोग्य सेविका निशिगंधा घोडखांदे, आरोग्य सेवक अमोल ढगे यांचा सत्कार करण्यात आला.