अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
Heavy rain with wind alert देशभरात पुन्हा एकदा हवामान बदलताना दिसत असून उकाडा वाढत असतानाच आता वादळी पावसाचा पुन्हा अलर्ट मिळाला आहेत. भारतीय हवामान विभागाने याबाबत इशारा देत पुढील काही दिवस विविध भागांत पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या परिणामामुळे आजपासून  ३१ मार्च दरम्यान हवामानात मोठे बदल जाणवू शकतात. विशेषतः जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांत पावसासोबतच हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी पुन्हा वाढू शकते. उत्तर भारतातही वातावरण ढगाळ राहून वादळी पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत जोरदार वारे वाहण्यासोबतच हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
 

Heavy rain with wind alert 
 
विदर्भातही पुढील काही दिवस पावसाचे 
पूर्वेकडील राज्यांमध्ये परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरायेथे मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य भारतात पुढील काही दिवस पावसाची सातत्याने नोंद होऊ शकते. मध्य प्रदेशमध्ये २७ ते ३१ मार्च दरम्यान हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर छत्तीसगड आणि विदर्भातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. यासोबतच सोसाट्याचे वारेही वाहू शकतात, ज्यामुळे वातावरणात गारवा जाणवेल. महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागांतही वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
 
 
 
 
दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातया राज्यांतही विविध ठिकाणी पावसासोबत मेघगर्जना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही किनारी भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्ली परिसरातही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हलका पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. २९ मार्चपासून आणखी एका हवामान प्रणालीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो. एकूणच, देशभरात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहणार असून, पाऊस, वारे आणि मेघगर्जना यांचा एकत्रित परिणाम अनेक भागांत जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.